पर्यावरणाची निगा राखणं आपल्याच हातात आहेत. सध्या शहरीकरणामुळे झाडांची अमाप कत्तल होत आहे. नवीन झाडे जगवणं तर सोडाच, जी झाडे आहेत त्यांची कत्तल केली जातेय. अशावेळी इंटरनेटवर एक फोटो व्हायरल होतोय आणि त्याची सर्वांकडून वाहवा केली जातेय.हा फोटो झारखंडचे डेप्युटी कलेक्टर संजय कुमार यांनी ट्वीटरवर शेअर केली. तसेच त्याखाली कॅप्शन लिहिली की एक फोटो हजार शब्दांपेक्षा जास्त बोलका असतो.
या फोटोमध्ये काही तरुण झाडाला मुळासकट खांद्यावर घेऊन दुसऱ्या ठिकाणी जमीनीत लावण्यासाठी घेऊन जात आहेत. जेव्हा कोणतही झाड रस्त्यात अडथळा म्हणून येतं तेव्हा ते निर्दयीपणे छाटलं जातं. हे तरुण मात्र झाड मुळासकट खांद्यावर नेऊन आदर्श घालत आहेत की झाड तोडण्याची गरज नाही ते दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्या मातीत लावता येतं. नेटकऱ्यांनी या तरुणांचे खुप कौतुक केले आहे. या फोटोला ५ हजारपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.