हा फोटो पाहून काही मिनिटातच तुमचा मेंदू किती शार्प आहे. हे माहित करून घेता येईल. सोशल मीडियावर एका जंगलातील फोटो तुफान व्हायरल होत आहे. काही जणांनी काही सेकंदातच या सापाला शोधलं आहे तर अनेकांना शोधून शोधूनही या फोटोतील साप सापडत नाहीये.
सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना या फोटोमध्ये सुकलेली पानं आणि काही लाकडं दिसत आहेत. लोकांना चँलेन्ज करणारा हा फोटो ट्विटर युजर @waitbutwhy नं ७ मे ला आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत सापाला शोधून दाखवा असं कॅप्शन दिलं आहे.
६००० पेक्षा जास्त लाईक्स आणि ८०० पेक्षा जास्त रिट्विटस या व्हिडीओला मिळाले आहेत. शेकडो लोकांनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. गेल्यावर्षीसुद्धा एका ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो व्हायरल झाला होता. या व्हायरल फोटोला निटेझन्सची तुफान प्रतिसाद देत सापांची संख्या सांगितली होती.
अनेकांनी या फोटोत एकापेक्षा जास्त साप शोधून त्यांचे फोटो ट्विटरवर कमेंट्स विभागात शेअर केले आहेत.