कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी गरबा, दांडीयांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. कोरोनाचं सावट असल्यामुळे प्रत्येक सण उत्सव हे साधेपणाने आणि शांततेत साजरे होत आहेत. अनेकांनी नियमांचे उल्लंघन न करता घरच्याघरी दांडीया खेळण्याचा आनंद घेतला आहे. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला माणूसकिचे आणि आपुलकिचे दर्शन नक्की घडेल. एक नातू आपल्या आजीला खुर्चीवर बसवून तिच्यासह गरबा खेळत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. गरब्याच्या गाण्यावर दोघंही गरबा खेळण्याचा आनंद घेत आहेत. वयोमानानुसार या आज्जींना घराबाहेर पडून गरबा खेळणं शक्य होत नाही. त्यामुळे या म्हाताऱ्या आजीला वाईट वाटत होतं. पण तिच्या नातवाने ही चिंता दूर केली आहे. आजी घराबाहेर जाऊ शकत नाही मग काय झालं? नातवाने घरच्याघरी आजीला कोणत्याही त्रास होऊ नये यासाठी खुर्चीवर बसवून गरबा खेळला आहे. प्रिया शुक्ला यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाह, नशीब चमकलं! मासेमाराच्या गळाला लागला ७५० किलोंचा दुर्मिळ 'मंटा-रे' मासा, पाहा फोटो
या व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सनी तुफान प्रतिसाद दिला असून आतापर्यंत अनेक मजेशीर कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. हा व्हिडीओ आत्तापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. आजी नातवाच्या अनोख्या गरब्याचं फारच कौतुक होत आहे. गरबा संपल्यानंतर हा चिमुरडा आपल्या आजीची गळाभेट घेतो. हा व्हिडीओ पाहून अनेकजण जागच्याजागी नाचालयाला लागले आहेत. सध्याच्या काळातील तरूण मुलं नेहमीच आपला मोबाईल आणि मित्र मैत्रिणींसोबत व्यस्त असतात. पण या व्हिडीओतील नातवाने आजीसोबत गरबा खेळण्यासाठी केलेला प्रयत्न पाहून सोशल मीडिया युजर्स भारावून गेले आहेत. काय सांगता राव! पठ्ठ्याला शेतात सापडली 'भली मोठी' शेंग; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्