माती तपासून पाहण्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला असाच एका आगळावेगळा प्रकार सांगणार आहोत. मातीची गुणवत्ता तपासण्याचा युनिक एक्सपेरिमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शास्त्रज्ञ कधी लॅबमध्ये तर कधी शेतात मातीची तपासणी करतात. स्विट्जरलँडमध्ये २ हजार पांढऱ्या रंगाच्या अंडरवेअर्सना जमीनीत गाडलं जात आहे. जेणेकरून या माध्यमातून मातीच्या गुणवत्तेबाबत माहिती मिळवता येऊ शकते.
रिपोर्ट्सनुसार स्विट्जरलँडमध्ये शेतकरी आणि बाग मालक मातीची क्वालिटी चाचणी करण्यासाठी २ हजार पांढच्या रंगाच्या अंडरवेअरर्स जमिनीत गाडत आहेत. स्टेट रिसर्च इंस्टिट्यूट एग्रोस्कोप या अभासात सहभागी असलेल्या स्वयंसेवकांनी मातीला गाडण्यासाठी २ हजार जोडी पांढऱ्या अंडरवेअर पाठवल्या आहेत. काही वेळानंतर या कपड्यांना बाहेर काढून चाचणी केली जाणार आहे. सुक्ष्म जीवांनी या कपड्यांना किती प्रमाणात नुकसान पोहोचवलं हे पाहिलं जाणार आहे. बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....
इकोलॉजिस्ट आणि या प्रोजेक्टचे प्रमुखे मार्सेल फॉन डेय हेइयन यांनी सांगितले की, ''या प्रकारचा प्रयोग कॅनडामध्ये करण्यात आला होता. याआधी टि बॅग्सचा मातीत गाडून संशोधन केलं जात होतं. आता अंडरवेअरच्या प्रयोगानंतर याचे परिक्षण करण्यासाठी मातीचे नमुने घेण्यात येणार आहेत. जर या अंडरवेअरमध्ये जास्त छिद्र असतील तर माती जास्त चांगली आहे, असा याचा अर्थ होतो. जपानमध्ये काही पुरूष नेते प्रेग्नेंट महिलांसारखे का फिरत आहेत? जाणून घ्या कारण......