करोना व्हायरसमुळे सर्वच ठिकाणी भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू होत असेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेकांचे हाल होत आहेत. तर अनेकांवर जीव वाचवण्यासाठी कोरोनाशी लढायची वेळ आली आहे. तर एका ठिकाणाहून इतर ठिकाणी गेलेल्या लोकांना १४ - १५ दिवस क्वारंटाईन राहण्यासाठी सक्ती केली आहे. या दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. क्वारंटाईन सेंटरमधील हा फोटो असल्याचे अनेकांचे म्हणणं आहे.
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रवासी मजूरांना पेपरवर जेवण वाढण्यात आलं आहे. द्रवपदार्थ असल्यामुळे पेपरवरून हे जेवण वाहून जाताना तुम्हाला दिसून येईल. हा फोटो पाहून युजर्सनी संपात व्यक्त केला आहे. हा फोटो ट्विटरवर @thealokputul यांनी शेअर केला आहे. त्यांनी या फोटोला कॅप्शन दिले आहे की, क्वारंटाईन सेंटरमध्ये कागदावर डाळ वाढल्यामुळे वाहून जात आहे.
हा फोटो छत्तीसगड मधील राजनांदगावमध्ये आहे. या ट्विटरच्या माध्यमातून प्रशानसाबाबत राग व्यक्त केला आहे. या फोटोला १ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. लोकांनी या फोटोवर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या आधीसुद्धा क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.
तहान-भुकेमुळे आईचा झाला होता मृत्यू, पण चिमुरडा तिला उठवत राहिला, खेळत राहिला!
जंगल बुक : 12 वर्षांच्या मुलामागे लागला अस्वल; त्यानंतर जे घडलं, ते पाहून सर्वच झाले हैराण