गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर प्राण्याच्या आणि पक्ष्यांच्या मुक्त संचाराचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऐरवी माणसांना पाहून धूम ठोकणारे प्राणी, आता शुकशुकाट असलेल्या रस्त्यांवर गर्दी करू लागले आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सना मात्र राग अनावर झाला आहे.
आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुमचं मन भरून येईल. या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रचरमुळे वन्य जीवांना अडथळा निर्माण होत आहे. त्यासाठी वनविभागाजवळील वन्य जीवांचाही विचार करायला हवा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक हत्तीचं पिल्लू कठडा ओलांडून वर चढण्यासाठी प्रयत्न करत आहे. रस्त्याच्या काठाला उभारण्यात आलेले कठडे हत्तीच्या पिल्लासाठी अडचण निर्माण करणारे आहे. काही लोकांनी सांगितले की, रस्त्यांच्या कडेला कॉरिडोर बांधायला हवेत.
या पूर्ण व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हत्ती सहजतेने रस्ता ओलांडत आहेत. परंतू लहानग्या पिल्लाला मात्र रस्ता ओलांडायला त्रास होत आहे. या मानवनिर्मीत समस्येला पार करण्याचा प्रयत्न हत्तीचं पिल्लू करत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहत असलेल्या लोकांना प्रचंड राग आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना जाणीव झाली की, पक्क्या रस्त्यांसोबतच प्राण्यांना ये जा करण्याकरिता कच्चे रस्ते ही असायला हवेत.
CoronaVirus News : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका
तुम्हालाही सतत मास्क लावल्यानंतर गुदमरतं का?; प्रवासात मास्क वापराचा की नाही, जाणून घ्या