मेरठच्या सौरभ हत्याकांडाने अवघ्या भारतभरात पुरुषांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. सौरभच्या पत्नीने त्याला ड्रममध्ये सिमेंट टाकून गाडले होते. आतापर्यंत पोलिसांना अनेक पुरुषांनी पत्नीकडून अशाप्रकारे संपविण्याची धमकी मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. एवढी त्या निळ्या ड्रमची दहशत असताना लग्नसमारंभात त्यांच्या मित्रांनी निळा ड्रम गिफ्ट केला आहे.
उत्तर भारतात आजकाल जो कोणी निळा ड्रम खरेदी करतोय त्याला तो कशासाठी खरेदी करतोय, या संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. निळ्या ड्रमची एवढी दहशत लोकांच्या मनात घर करून असताना लग्ना समारंभातच मित्राला ड्रम गिफ्ट करण्यात आल्याने यावर चर्चा होत आहे.
सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. यात काहतरी हटके करण्याचा प्रयत्न लोक करत असतात. त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतात आणि हे लोक फेसम होतात. अशातच मित्राला लग्नात काय गिफ्ट द्यावे असा सुपिक विचार करणाऱ्या मित्रांच्या मनात निळ्या ड्रमची आयडिया घोळू लागली आहे. नवरदेवाच्या मित्रांनी नव्या नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला आहे.
हा ड्रम स्टेजवर पाहुन उपस्थित वऱ्हाडींच्या मनातही काही काळ खळबळ उडाली होती. या ड्रमला मित्रांनी लाल रिबिन लावली होती. मित्रांना हा ड्रम आणताना पाहून नवरदेवाच्या चेहऱ्यावर हसू आले आहे, परंतू नवरीच जास्त खळखळून हसताना दिसत आहे. यानंतर तिथे हास्यविनोदही रंगल्याचे दिसत आहेत.
आता हा ट्रेंड येणार आहे. हा पहिलाच व्हिडीओ नाहीय. यापूर्वीही उत्तर प्रदेशातील हमीरपूरमधून असाच एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एका नवविवाहित जोडप्याच्या मित्रांनी लग्नाच्या मंचावर येऊन त्यांना निळा ड्रम भेट दिला होता.