सध्या एक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियात याच व्हिडीओवर अनेकांची चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ पाहून IFS अधिकारी सुशांत नंदाही चक्रावले. रस्ते अपघातातील ट्रकची झालेली अवस्था पाहून अंगाचा थरकाप उडेल. इतका भीषण हा अपघात घडला आहे.
एका कच्च्या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात घडला. त्यात ट्रकचे २ भाग झाले. हा व्हिडीओ खूप भयंकर आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ट्रक, कंटेनर नेहमी ओवर लोडिंग केले जातात. त्यामुळे बरेच अपघात घडल्याचं पाहायला मिळालं आहे. गाडी पलटल्यामुळे वाहन चालकाचा मृत्यू झाला असेल असं वाटेल. हा व्हिडीओही ओवरलोडिंग झालेल्या ट्रकचा आहे. ज्यात क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने तो पलटी होतो आणि ट्रकचे २ तुकडे होतात.
व्हिडीओत काय आहे?
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ओवर लोडिंग ट्रक कच्च्या रस्त्याने जात असतो. पावसामुळे रस्त्यावर मोठा चिखल झालेला दिसतो. ट्रकमध्ये प्रचंड सामान असतं. जेव्हा वळणावरुन हा ट्रक जात असतो तेव्हा त्याचं नियंत्रण सुटतं आणि तो पलटी होतो. व्हिडीओ पूर्ण पाहिला तर त्याच्या भीषणतेचा अंदाज येऊ शकेल. ट्रक एका बाजूला पडलेल्या गवताच्या ढिगाकडे जातो. या अपघातात ड्रायव्हर ढिगाऱ्यात दबल्याने मृत्यू झाला असावा असं व्हिडीओ पाहून वाटेल.
ट्रकाचे २ तुकडे होतात
व्हिडीओनुसार, ट्रकच्या वरील भाग पूर्णपणे विखुरला जातो. आणि पुढील भाग चालूच राहतो. तेव्हा पुढील भाग रोखण्यासाठी ड्रायव्हर मागे मागे धावताना दिसून येतो. हा व्हिडीओ शेअर करत आयएफएस अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, आत्मा शरीराचा त्याग करतोय. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून कमेंट्स केल्या आहेत.