Optical Illusion Challenge : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे फोटो सोशल मीडियावर एकमेकांना पाठवून बरेच लोक चॅलेंजही देतात. या फोटोंमधील गोष्टी शोधण्यात किंवा यातील रहस्य उलगडण्यात एक वेगळीच गंमत असते. त्यामुळेच लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही हे फोटो आवडतात. या फोटोंची एक महत्वाची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. असाच एक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. तर कधी यांमध्ये फरक किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. यात तुम्हाला सगळीकडे 09 हा नंबर दिसत आहे. यातच तुम्हाला 89 हा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये गोष्टी फार हुशारीने लपवण्यात आलेल्या असतात. म्हणजे आपल्या डोळ्यांसमोरच असलेल्या गोष्टी आपल्याला सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि मेहनतही घ्यावी लागते. तर तुम्ही जीनिअस असाल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर तुम्ही वेळेत यातील गोष्टी शोधू शकता.
अनेकदा फोटोत एकसारख्या गोष्टी दिसल्याने कन्फ्यूजन व्हायला होतं. अशात ज्या गोष्टी शोधायच्या आहेत त्या लगेच सापडत नाहीत. जर तुम्हाला या फोटोतील वेगळा नंबर तुम्हाला सापडला असेल तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही सापडला नसेल निराशही होऊ नका. कारण तो कुठे आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो वेगळा नंबर बघू शकता.
फोटोतील वेगळा नंबर वरच्या फोटोत सर्कल केला आहे.