सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून अनेक लोक तो पाहून आश्चर्यचकित होत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? हा व्हिडीओ आईच्या गर्भामध्ये भांडणाऱ्या दोन जुळ्या भावंडांचा आहे. गोंधळलात ना? आतापर्यंत आपण भावंडांच्या भांडणाचे अनेक किस्से ऐकले आहेत. पण ही भावंडं तर चक्क जन्माआधीच आईच्या गर्भभातच भांडताना दिसत आहेत. आईच्या गर्भामध्ये कसं काय बाळ भांडू शकतं? हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल... खरं तर हा व्हिडीओ एका आईच्या सोनोग्राफीचा आहे. या अल्ट्रासाउंड व्हिडीओबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. ही घटना चीनमधील असून या व्हिडीओमध्ये आईच्या गर्भामध्ये दोन जुळी मुलं एमेकांशी भांडताना दिसत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ साधारणतः वर्षभरापूर्वी चीनमधून शेअर करण्यात आला होता. ही महिला चार महिन्यांची गर्भवती होती आणि ती जुळ्या बाळांना जन्म देणार होती. त्यावेळी तिने चीनमधील यिनचुआनमध्ये एका क्लिनिकमध्ये अल्ट्रासाउंड केलं होतं. त्यावेळा या बाळांच्या वडिलांनी त्यांचा अर्भकांचा हा प्रताप कॅमेऱ्यात शूट केला होता.
महिलेच्या पतिने एका स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, 'पोटातील अर्भकं बराच वेळ एकमेकांशी भांडत असल्याचे दिसून आले.' हा व्हिडीओ चीनमध्ये प्रचंड व्हायरल झाला होता. टाओने व्हिडीओ अॅप Douyin वरून हा व्हिडीओ शेअर केला होता. ओरिजनल व्हिडीओ 2.5 मिलियन लोकांनी पाहिला असून 80 हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आले आहेत.
आता या मुलींचा जन्म झाला आहे. एकीचं नाव चेरी आणि दुसरीचं नाव स्ट्रॉबेरी ठेवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून एका यूजरने लिहिलं आहे की, 'या दोघीही आईच्या पोटात भांडत होत्या. परंतु आता एकमेकींवर खूप प्रेम करतील.' मुलींचे वडिल टाओ यांनी सांगितले की, आणखी एक अल्ट्रासाउंड करण्यात आलं होतं, त्यामध्ये दोघी एकमेकींना मिठी मारत होत्या.'
टाओ यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, 'माझ्या दोन्ही मुली फार गोड आहेत. त्या एकमेकींची फार काळजी घेतात. जेव्हा त्यांची आई मेडिकल टेस्टसाठी जाते. तेव्हा त्या एकमेकींना सांभाळून घेतात. मोठ्या झाल्यावर या दोघी कायम एकत्र असतील.'