जेव्हापासून Elon Musk एलॉन मस्कने ट्विटर ताब्यात घेतले आहे तेव्हापासून काही ना काही नवे वाद होत आहेत. मस्कने अनेकांना नोकरीवरुन काढुन टाकले तर अनेक जण स्वत:हुनच राजीनामा देत आहेत. ब्लू टिक साठी पैसे मोजावे लागणार यावरुन तर सेलिब्रिटींनी ट्विटरच सोडले. तर ट्विटर कार्यालय काही काळासाठी बंद असून २१ नोव्हेंबर ला पुन्हा उघडेल असे सांगण्यात आले.
या सर्व प्रकारावरुन आता #RipTwitter आरआयपी ट्विटर ट्रेंड होत आहे. याला धरुन नेटकरी अनेक मीम शोअर करत आहेत. मस्क ने तर स्वत:च ट्विटरची कबर असलेला फोटो शेअर केला आहे. ट्विटर बंद होणार यावर मस्क युझर्स ला रिप्लाय करताना ही ट्विटर वर बघायला मिळत आहे. या ट्रोलिंगमुळे मस्क यांना चांगलाच फरक पडलेला दिसतोय.
ब्रिटनचे प्रसिद्ध पत्रकार पिअर्स मॉर्गन यांनी ट्विट केले, 'एलॉन मस्क ने ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटर बंद पडणार म्हणून सर्व का ओरडत आहेत. त्यापेक्षा ट्विटर डिलीट करा.'पिअर्स यांच्या ट्विटवर एलॉन मस्क यांना 'खरंच' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या ट्विटरवर एलॉन मस्क खुपच ट्रोल होत आहे. खरेच ट्विटर बंद पडणार का असाच प्रश्न सगळ्यांना पडलाय.