कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात अनेक महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये रोजगारावर परिणाम झाल्याने अनेकांवर वाईट वेळ आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. दिल्लीमध्ये मालविया नगरमध्ये एका ८० वर्षीय आजोबांनी आपल्या पत्नीसह 'बाबा का ढाबा' (Baba Ka Dhaba) सुरू केला होता.
कोरोनाच्या काळात मुलांनी मदत करण्यास नकार दिल्यानंतर हे जोडपं ढाबा चालवत आहे. एका यूट्यूबरने हा व्हिडीओ रेकॉर्ड करू शेअर केला होता. व्हिडीओमध्ये आजोबांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये ढाब्याला कमी प्रतिसाद मिळत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. अवघ्या काही तासांत हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी आजोबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. एका दिवसात #BabaKaDhaba ट्रेंड होऊ लागलं, आणि आज सकाळपासून या ढाब्यावर लोकांनी तुफान गर्दी केली.
या गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनाही विश्वास बसला नाही. 80 वर्षीय जोडप्याला मदत करण्यासाठी लोकांनी ढाब्यावर गर्दी केली. जे लोक ढाब्यावर जाऊ शकत नव्हते त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून या वृद्धा दाम्पत्याला मदतीचा हात दिला आहे. भारीच! औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली काश्मिर सारखी सफरचंद; २० वर्षांपर्यंत येतात फळं
कमी वेळात भरभरून मदत मिळल्यामुळे काहीवेळापूर्वी रडत असलेल्या आजोबांच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे. या 80 वर्षीय आजोबांनी लोकांचे आभार मानत, ज्यांना दोन वेळचं अन्न मिळत नाही, त्यांनी ढाब्यावर यावे त्यांची मी सोय करणार असल्याचे सांगितले आहे. विमान प्रवासादरम्यान महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
पाहा या आजोबांची प्रतिक्रिया