जग सध्या फारच कठिण स्थितीतून जात आहे. सगळेच कोरोनासोबत लढत आहेत. जगातील अर्धे लोक घरांमध्ये लॉकडाऊन आहेत. अशात जास्तीत जास्त लोक कोरोनाशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यात एका ट्विटर यूजरची चांगलीच चर्चा रंगली आहे. या यूजरचं नाव आहे @NorbertElekes.
हा यूजर एखाद्या सरकारी वेबसाईटप्रमाणे लोकांना कोरोनाशी संबंधित आकेडवारी देण्याचं काम करतोय. पण लोक त्याचे आभार मानत नसून त्याला 'यमदूत' म्हणत आहेत.
या व्यक्तीचं नाव आहे नॉर्बर्ट एलीक्स. तो हंगरीचा राहणारा आहे. त्याला ट्विटरवर 2 लाख लोक फॉलो करतात. तो एक तरूण उद्योजक आहे. दररोज तो आता लोकांना कोरोनाचे अपडेट्स देत असतो.
पण प्रश्न हा उभा राहतो की, तो लोकांना कोरोना संबंधित माहिती देत आहेत. पण मग लोक त्याला 'यमदूत' का म्हणत आहे? तर नॉर्बर्ट हा त्याच्या ट्विटमध्ये मरणाऱ्या लोकांची संख्याही देत आहे आणि वाढलेल्या केसेसही सांगत आहे. अर्थातच हे सगळं भयावह किंवा धडकी भरवणारं आहे.
कदाचित हेच कारण आहे की, त्याला भारतातील लोक 'यमदूत' म्हणत आहेत. काही लोकांनी त्याच्या ट्विटवर कमेंट केल्या आहेत की, कोरोनापासून वाचलो तर, हा भीती दाखवून जीव घेईल.
जगभरात सध्या 19 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 लाखांपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे कोरोनाची लागण झालेले 4 लाखांपेक्षा अधिक लोक बरेही झाले आहेत.