नेहमी वाण्याकडून तांदूळ किंवा इतर सामान आणल्यानंतर तुम्ही ती गोणी फेकून देत असाल. पण या रिकाम्या गोणीला परदेशात ऑनलाईन विक्रीत हजारो रुपये किंमत मिळत आहे. तुम्ही म्हणाल रिकाम्या गोणीत किंवा पिशवीत एवढं काय असतं? घरात अनेकदा अशा गोण्या सर्रास सापडतात अडचण नको म्हणून आपण कधीतरी गोण्या फेकून देतो. याच गोण्या ऑनलाईन बाजारात हजारो रुपयांनी विकल्या जातात. माइक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म वर या बासमती तांदळाच्या पिशव्या विक्रीसाठी आहेत.
मागच्या आठवड्यात एका ट्विटर युजरनं बासमती तांदळाच्या या पिशवीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन दिलं होतं की, हे खरं आहे याबाबत मला विश्वास वाटत नाही. गोणीतून तांदूळ काढून विकायला ठेवली जात आहे. ज्या गोणीचा वापर बासमती तांदळाच्या ४.५ किलो वजनासाठी केला जातो. आता या पिशवीला चेन लावून विक्रीस ठेवले आहे.
ट्विटरवरच्या या फोटोनुसार याची किंमत १५ डॉलर म्हणजेच जवळपास १ हजार १०० रुपये आहे हे ट्विट ५ सप्टेंबरला शेअर करण्यात आलं होतं. आतापर्यंत या ट्विटला ७४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून ९ हजारांपेक्षा जास्त रिट्वि्ट्स आणि ३०० पेक्षा जास्त रिएक्शन्स मिळाल्या आहेत. अनेकांना रिसायकल करण्याचा उत्तम पर्याय असल्याचे म्हटलं आहे. अनेक ट्विटर युजर्सनी तांदळाच्या गोणीला ऑनलाईन विकण्यास उत्सुक असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.
हे पण वाचा-
बाबो! ज्याला हत्येप्रकरणी सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा 'तो'च खासदार झाला; अन् मग.....
काय सांगता? भारतातल्या 'या' मंदिरामध्ये चक्क प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो गांजा
कोरोनावर मात करणारी लस कधी येणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं उत्तर; म्हणाले....