(Image Credit : Biswajit (@meme_lord_biswa) | Twitter)
नो शेव्ह नोव्हेंबर... म्हणजे वर्षातील असा एक महिना ज्या महिन्यात शेव्ह करायचं नाही. दाढी आणि मिशा वाढवायच्या आपल्या हटके अंदाजात. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच #NoShaveNovember चा ट्रेन्ड सुरू होतो. प्रत्येकजण त्यांच्या वाढलेल्या दाढींचे फोटो अपलोड करत, नो शेव्ह महिना साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंडच भारतातील लोकं वापरताना दिसत आहेत.
अगदी महाविद्यालयीन तरुणांपासून ते कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सगळेचजण हा महिना एखाद्या सणासारखा साजरा करतात. पण हा महिना साजरा करण्यामागे नेमका काय उद्देश आहे, याचा कधी विचार केलाय का तुम्ही? #NoShaveNovember एका सामाजिक उद्देशासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे.
पण, यामध्ये दाढी न करणारी किती लोक चॅरिटी करतात माहीत नाही. परंतु, मोठ्या उत्साहात नो शेव्ह नोव्हेंबर साजरा केला जातो. एवढचं नाहीतर मागील काही वर्षांपासून तरूणांमध्ये दाढी वाढविण्याची क्रेझ दिसून येते. पण भारतीय आई-वडिलांचं काय? चुकूनही दाढी वाढवलेली दिसली तर मग घरात तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली म्हणून समजा. वडिल एखादे वेळी दुर्लक्षं करतील पण आई... ती आपल्या मुलाला वाढलेल्या दाढीत पाहूच शकत नाही.
सोशल मीडियावरही असेच काही भन्नाट मिम्स व्हायरल होत आहेत. नो शेव्ह नोव्हेंबरचे हे मीम्स अनेकजण शेअर करत आहे.