शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अफलातून! दोन मधमाशांनी उघडलं बाटलीचं झाकण; एकीचं बळ दाखवणारा भन्नाट VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 14:35 IST

दोन मधमाशांनी पद्धतशीरपणे उघडलं प्लास्टिकच्या बाटलीचं झाकण

तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आपल्याला माहीत आहे. पाणी पिण्यासाठी रांजणात खडे टाकून कावळ्यानं स्वत:ची तहान भागवली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा धडा या गोष्टीनं आपल्याला दिला. याशिवाय एकीचं बळ सांगणाऱ्या गोष्टीदेखील आपण लहानपणापासून ऐकत आहोत. यानंतर आता या दोन्ही गोष्टी एकत्रित स्वरुपात दाखवणारा एक अफलातून व्हिडीओ समोर आला आहे. दोन मधमाशांनी मिळून एका बाटलीचं झाकण उघडलं असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र खरंच असं घडलंय. ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये दोन मधमाशांनी मिळून एका प्लास्टिकच्या बाटलीचं झाकण उघडलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. व्हायरलहॉग एजन्सीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. दोन मधमाशांनी अतिशय पद्धतशीरपणे बाटलीचं झाकण उघडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दहा सेकंदांच्या व्हिडीओमध्ये दोन मधमाशा झाकणावर एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसल्या आहेत. मधमाशा झाकणाला वरच्या दिशेनं फिरवत आहेत. त्यामुळे झाकण हळूहळू वरच्या दिशेनं सरकत आहे. आपल्या पुढील पायांच्या मदतीनं मधमाशा झाकण उघडत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. 'माझ्या कार्यालयीन वेळेत लंच ब्रेक असताना मी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला,' असं व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीनं सांगितल्याचं व्हायरलहॉगनं वृत्तात म्हटलं आहे. ट्विटरवर या व्हिडीओला १३ लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. यूट्यूबवरही लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.