सापाचं नाव ऐकलं तरी तरी अनेकांची भंबेरी उडते. साप आहेच असा विषारी प्राणी की त्याला पाहताच अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही. साप जंगलात, रानावनात पाहायला मिळतो. आजकाल मानवी वस्त्यांमध्येही साप मिळण्याचं प्रमाण वाढलंय. अशातच समजा तुमच्या घरातच सापाने दर्शन दिले तेही सोफ्यावर तर तुम्ही काय कराल? पाहा या व्हिडिओतल्या दोघीजणींनी काय केलंय.
सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुली सोफ्यावर अगदी आरामात बसलेल्या आहेत. दोघीही आपल्या फोनमध्ये व्यस्त असून मध्येमध्ये एकमेकींसोबत गप्पाही मारत आहेत. दोघीही इतक्यात मग्न आहेत, की आपल्या जवळ एक साप आल्याचंही त्यांना जाणवलं नाही. गप्पांच्या नादात त्यांना हेदेखील समजत नाही की एक साप हळूहळू सरपटत सोफ्यावर आला आहे.
अचानक काहीतरी धाडकन सोफ्यावर पडल्याचा आवाज होतो. यानंतर दोघींना समजतं की सोफ्यावर काहीतरी आहे. यातील एक मुलगी सापाला न पाहताच मोठमोठ्यानं ओरडू लागते. तर, दुसरी सापाला पाहताच तिथून पळ काढते. मात्र, हा साप खोटा असल्याचं शेवटी समजतं. कोणीतरी या दोघींना मुद्दाम भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होतं.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. official_niranjanm87 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ ुपोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.