प्रेम मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतात. एखाद्या तरुणीवर बऱ्याच तरुणांचं प्रेम जडलं की ते त्या तरुणीला आपली गर्लफ्रेंड बनवण्यासाठी काय काय करतात हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण यात तरुणीही मागे नाहीत. एखादा तरुण आवडला तर त्याला बॉयफ्रेंड बनवण्यासाठी त्या कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात, हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (2 Girl fight for one boyfriend).
एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये जुंपली आहे. भररस्त्यात तरुणींची एका तरुणासाठी जबरदस्त फायटिंग झाली आहे. दोघीही रस्त्यातच आपसात भिडल्या. त्यांनी एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या, हातात काठी घेऊन एकमेकींना बदडूनही काढलं. रस्त्याला त्यांनी आखाडाच करून टाकला. तिथं उपस्थित असलेल्या कुणीतरी तरुणींच्या मारहाणीचा हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर पोस्ट केला.
व्हिडीओत पाहू शकता बऱ्याच तरुणी रस्त्यावर दिसत आहेत. आपसात भांडणाऱ्या दोन तरुणींचे हे गट आहेत. आधी हातांनी एकमेकांशी फाइट करता करता एक तरुणी रस्त्यावर पडलेली काठी घेते आणि त्या काठीने दुसऱ्या तरुणीला मारते. त्यानंतर एक तिसरी तरुणीला तिला मागे खेचते आणि त्यांच्यामध्ये जुंपते. त्यानंतर त्या एकमेंकींच्या झिंझ्या उपटतात. त्यानंतर ज्या तरुणीने आधी दुसऱ्या तरुणीला काठीने मारलं तिलाही काठीचा मार मिळतो. लाथाबुक्क्यांनीही त्या एमेकांना मारत आहेत.
@askbhupi ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही घटना उत्तराखंडच्या हल्द्वानीतील हिरानगरच्या पोलीस योगा पार्कातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तरुणींना मारहाण करण्यापासून रोखलं.
बॉयफ्रेंडसाठी आपसात भिडणाऱ्या तरुणींचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधीही अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकीच एक ऑक्टोबर 2018 सालातील हिमाचल प्रदेशमधील प्रकरण. हमीरपूर जिल्ह्यातील बडसर कॉलेजमध्ये दोन तरुणींना एकमेकींना जबरदस्त मारहाण केली. याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये एक तरुणी दुसऱ्या तरुणीला धमकावत होती. 'मी तुला सांगितलं होतं त्याला ब्लॉक कर, पण तू तसं नाही केलं नाहीस', असं म्हणत या दोघी भांडत होत्या