सोशल मीडियावर वेगवेगळे आवाहानात्मक फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो रविवारी १५ सप्टेंबरला डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी केजरीवाल यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता. ट्विटर युजर @Atheist_Krishna यांनी या फोटोत फोटशॉप वापरून पुन्हा तयार केला आणि ट्विटरवर शेअर केला आहे.
अरविंद केजरीवाल यांचा हा फोटो बघता बघता व्हायरल झाला आणि नेटिझन्सचा तुफान प्रतिसाद या फोटोला मिळला आहे. ट्विटर युजर कृष्णा यांनी सोशल मीडिया युजर्सना आव्हान दिलं आहे की, या दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा. अनेकांनी प्रयत्न करून या दोन फोटोंमधील फरक शोधून दाखवला आहे.
सोमवारी हा फोटो ट्विटवर शेअर करण्यात आला होता.या फोटोला ३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि १ हजारापेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट करून या फोटोतील दहा फरक सांगितले आहेत. तुम्हीही हे दहा फरक ओळखून कमेंट्समध्ये उत्तर देऊ शकता.
हे पण वाचा-
बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ
लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...