बायकांची नळावर पाणी भरतानाची भांडणं तुम्ही अनेकदा पाहिली असतीलच. तशीच लग्नातही अनेकदा महिलांची काही कारणांवरून भांडणं होतात आणि आजूबाजूची लोकं मस्त मजा घेतात. असाच एका भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. इंडोनिशियातील या व्हिडीओत एका लग्नात दोन महिला ऐन 'पंगतीत' जोरजोरात भांडू लागल्या आणि बाकीचे लोक त्यांना बघत राहिले.
आता हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून लोक मजेदार कमेंटही करत आहेत. तुम्ही अनेकदा आपल्या देशातील महिलांची भांडणं, त्यांची भांडणाची स्टाइल पाहिली असेल. पण आज तुम्हाला इंडोनेशियातील महिला कशी भांडणात हे या व्हिडीओतून बघायला मिळणार आहे.
Indiatimes वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, या दोनपैकी एक महिलेने दुसऱ्या महिलेला काहीतरी म्हटलं. ती म्हणाली 'तुला लाज नाही का वाटत, तू क्लासलेस आहेस. सगळ्या गावाचं जेवण घेऊन जाणार का इथून?', बस्स...दुसऱ्या महिलेचा पार चढला आणि बाचाबाची घरापर्यंत गेली. अशात बाकीचे लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण खरंच बायकांना आवरणं इतकं सोपं वाटतं का?