राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये दोन वाघांचा एकमेकांशी भांडतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आयएफएस अधिकारी प्रवीन कासवान यांच्यानुसार, वाघ टी57 आणि टी58 आहेत. कासवान यांनी बुधवारी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आणि या दोन वाघांच्या भांडणाला क्रूर आणि हिंसक लढाई असं सांगितलं.
रणथंबोर गाइड्सनुसार, टी57चं नाव सिंगस्थ आणि टी58चं नाव रॉकी आहे. हे दोघेही भाऊ आहेत आणि जयसिंघपुरा क्षेत्रातील वाघिण शर्मीलीची मुलं आहेत. व्हिडीओ शेअर केल्यानंतर कासवान यांना सांगितलं की, हे दोघं भाऊ टी 39 नंबरची वाघिण जिचं नाव नूर आहे. तिच्यासाठी एकमेकांशी भांडत आहेत.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, दोघं वाघ भांडत आहेत आणि झाडामध्ये एक वाघीण उभी आहे. पम या दोघांमधील भांडणं वाढल्यानंतर वाघिण तिथून पळून जाते.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर 24 हजारांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. तसेच अनेक कमेंट्सही आहेत. कासवान यांनी सांगितले की, वाघांच्या या लढाईमध्ये टी57 जिंकला असून यामध्ये कोणाला दुखापत झाली नाही.