शहरातच नाही, तर खेड्यापाड्यांत अनेक प्रकारचे साप दिसतात आणि त्याचे कारण म्हणजे खेड्यात असलेली हिरवळ, झाडे-झाडे, जंगलं. तुम्ही गावात राहत असाल तर तुम्हीही कधी ना कधी साप पाहिला असेल, पण तुम्ही कधी सापांना नाचताना पाहिले आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन साप जंगलात नाचताना दिसत आहेत. टेक कंपनी झोहोचे सीईओ श्रीधर वेम्बू यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘आज टेंकासी इथं मुसळधार पावसादरम्यान अमेझिंग स्नेक डान्स पाहायला मिळाला.’ व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हलक्या पिवळ्या रंगाचे दोन्ही साप उजवीकडून डावीकडे सरकत कसे नाचत आहेत. त्यांच्याकडे बघून ते एखाद्या गाण्यावर नाचत असल्याचा भास होतो.
एखादं गाणं वाजवलं तर माणसं नाचणं साहजिकच आहे, पण इथे सापांचा नाच खूप वेगळा अनुभव देतो आणि तोही कोणत्याही गाण्याशिवाय. सहसा असे दृश्य क्वचितच पाहायला मिळते. सापांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी ते लोकांना खूप आवडतात. खरं म्हणजे हे साप नाचत नाही, तर तो त्यांचा प्रणय प्रसंग आहे. नर मादी मिलन करण्याआधी अशाप्रकारे नृत्य करतात.