Shivsena Revolt Ukhad Diya Trending: एकनाथ शिंदेंसह एकूण ३९ आमदारांनी शिवसेनेविरोधात व महाविकास आघाडीविरोधात बंड पुकारल्याने अखेर २९ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. उद्धव यांच्या राजीनाम्यासह महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. आता एकनाथ शिंदे गटाच्या साथीने भाजपाचे सरकार राज्यात स्थापन होईल अशी चर्चा आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी आज एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.
उखाड दिया हे काय ट्रेंड होतंय?
शिवसेना पक्ष, महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांच्याविरोधात बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणौत हिने टीकेचा भडीमार केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनीही कंगनावर टीका केली होती. त्यावर उत्तर देताना, मी तुमच्यावर टीका करायची थांबणार नाही, तुम्हाला जे करायचंय ते करा (जो उखाडना है, उखाड लो) असे कंगना म्हणाली होती. या प्रकारानंतर कंगनाच्या मुंबईतील एका मालमत्तेवर शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेकडून बुलडोझर चालवण्यात आला. त्याचा फोटो पहिल्यापानावर छापत सामनामध्ये मोठ्या अक्षरात 'उखाड दिया' असं लिहिण्यात आलं होतं. या साऱ्या घटनाक्रमानंतर 'उखाड दिया' (#Ukhad Diya) हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसला.
--
--
--
--
--
काल राज्यात मोठ्या राजकीय नाट्यानंतर अखेर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांत संपुष्टात आले. त्यानंतरही कंगना राणौतचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला. "उद्धव ठाकरे, आज तुम्ही माझं घर तोडलं आहेत, एक दिवस तुम्हालाही मोठा धक्का बसेल", असा तो व्हिडीओ होता. तो व्हिडीओ ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला.