काही तासांत कीवपर्यंत धडक मारणाऱ्या रशियन फौजांची युक्रेनमध्ये खूपच दयनीय अवस्था झाली आहे. अनेक रणगाडे नादुरुस्त किंवा इंधन संपल्याने वाटेतच बंद पडले आहेत. तर त्यातील सैनिक अन्न पाण्यावासून हैराण झाले आहेत. यातच एका शेतकऱ्याने रशियन रणगाडाच पळून नेल्याने रशियाची सर्वत्र नाचक्की होऊ लागली आहे.
युक्रेनचे ऑस्ट्रियातील राजदूत ओलेजेंट स्चेर्बा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हल्ले सुरु असताना युक्रेनचा एक शेतकरी रशियाचा टँकच पळवून नेत असताना यात दिसत आहे. एक व्यक्ती त्या ट्रॅक्टरमध्ये चढण्यासाठी त्याचा मागोमाग धावत आहे, तिथे उपस्थित काही बोलत आणि हसत या प्रकाराची खिल्ली उडवत आहेत. स्चेर्बा यांनी कन्फर्म केलेले नसले तरी हे जर खरे असलेतर हा जगातील असा पहिला टँक असेल जो कोणत्या शेतकऱ्याने पळविला असेल.
हा व्हिडीओ खरा असेल किंवा नसेल, तरीही लोक याचा आनंद घेत आहेत. हास्यविनोद करत आहेत. एका युजरने म्हटले, 'मला आशा आहे की हे खरे आहे. या आठवड्यात भयंकर हल्ले सुरू झाल्यापासून मी पहिल्यांदाच हसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हसू आवरता आले नाही.
दोन दिवसांपूर्वी एक युक्रेनियन ड्रायव्हर बंद पडलेल्या रशियन टँकजवळ थांबून तिथे उभ्या असलेल्या सैनिकांना रशियात पुन्हा नेऊन सोडू का असे विचारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये आणखी काही टँक रस्त्यावर बंद पडलेले दिसत होते.