VIDEO : यूक्रेनच्या सैनिकाने दिला जिवंत असल्याचा पुरावा, युद्धादरम्यान मुलीसाठी केला 'मून वॉक'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 05:14 PM2022-03-03T17:14:52+5:302022-03-03T17:16:27+5:30

Ukraine Soldier dance video : या यूक्रेनच्या सैनिकाला पत्नी आणि तीन मुली आहेत. ज्यांच्यासाठी त्याने हा व्हिडीओ बनवला. सैनिकाने हे केलं कारण त्यांना कळावं की तो जिवंत आहे आणि अनेक अडचणींनंतरही सगळंकाही ठीक आहे.

Ukrainian soldier made a video to tell family that he is alive | VIDEO : यूक्रेनच्या सैनिकाने दिला जिवंत असल्याचा पुरावा, युद्धादरम्यान मुलीसाठी केला 'मून वॉक'

VIDEO : यूक्रेनच्या सैनिकाने दिला जिवंत असल्याचा पुरावा, युद्धादरम्यान मुलीसाठी केला 'मून वॉक'

googlenewsNext

Russia Ukraine War: रशिया आणि यूक्रेनच्या युद्धा दरम्यान यूक्रेनच्या एका सैनिकाने सोशल मीडिया नेटवर्कचा (Ukraine Soldier dance video)  चांगला वापर केला. त्याने त्याच्या परिवारातील लोकांना हे सांगण्यासाठी एक टिकटॉक व्हिडीओ बनवला की तो वॉर झोनमध्ये पूर्णपणे ठीक आहे. या यूक्रेनच्या सैनिकाला पत्नी आणि तीन मुली आहेत. ज्यांच्यासाठी त्याने हा व्हिडीओ बनवला. सैनिकाने हे केलं कारण त्यांना कळावं की तो जिवंत आहे आणि अनेक अडचणींनंतरही सगळंकाही ठीक आहे.

हा टिकटॉक व्हिडीओ करताना यूक्रेनी सैनिकाच्या चेहऱ्यावर कोणतीही निराशा दिसत नव्हती. त्याने त्याच्या परिवाराला आनंद देण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी डान्स केला. या सैनिकाला टिकटॉकवर साधारण चार मिलियन फॉलोअर्स आहेत. सैनिकांचं नाव अनातोली स्टीफन आहे. त्याचे टिकटॉक यूजर्स त्याला एलेक्स हुक नावाने ओळखतात. त्याने २०२० मध्ये  व्हिडीओ अपलोड करणं सुरू केलं होतं. 

काही महिन्यांआधी जेव्हापासून रशियासोबत तणाव वाढणं सुरू झालं तेव्हा @alexHuk2303 ने त्याचे डान्सचे व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड करणं सुरू केलं आणि आपल्या परिवाराला सांगितलं की, तो ठीक आहे. त्यामुळेच त्याचे अनेक व्हिडीओ लोकप्रिय झाले. रशियाकडून यूक्रेनवर हल्ला करण्याच्या घोषणेनंतर अनातोली स्टीफनने व्हिडीओ पोस्ट करणं बंद केलं होतं. त्याच्या फॉलोअर्सना वाटलं की तो युद्धात मरण पावला. 

या सोमवारी अनातोलीने व्हिडीओ पोस्ट करून हे सांगितलं की, तो जिवंत आहे. त्याने एक सेल्फी व्हिडीओ पोस्ट करत हे दाखवलं की तो जिवंत आहे. व्हिडीओत स्टीफनने अर्धा चेहरा झाकलेला होता आणि सैनिकाच्या ड्रेसमध्ये होता. स्टीफन म्हणाला की, 'आम्ही जिवंत आहोत, आम्ही यूक्रेनच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत'.
 

Web Title: Ukrainian soldier made a video to tell family that he is alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.