सामान्यपणे घर बनवताना दरवाजाचा विषय निघाला की, त्याची दिशा कोणती असावी, कशी असावी याचा विचार केला जातो. तुम्ही एकदी दरवाजा नसलेलं गाव शनीशिंगणापूरबाबतही ऐकलं असेलच. पण आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्याच रुमबाबत सांगणार आहोत. खास बाब म्हणजे या रुममध्ये जाण्यासाठी दरवाजाच नाहीये. आता तुम्ही विचार करत असाल की, रुममध्ये जाण्यासाठी दरवाजाच नसेल तर लोक आत कसे जात असतील? चला जाणून घेऊ याबाबत.....
खरंतर या रुमला जगातील सर्वात अनोखी रुम म्हणायला पाहिजे. लंडन येथील लीवरपूल स्ट्रीटजवळ असलेल्या या रुममधील आणखी एक गोष्ट हैराण करते ती म्हणजे या रुमचं भाडं. या अनोख्या रुमसाठी ५१ हजार ५६० रुपये भाडं द्यावं लागतं.
ही रुम आतून बघायला फार सुंदर दिसते. या रुममध्ये आवश्यक सगळ्याच वस्तू आहेत. रुममध्ये बेड, कपाट, टेबल, खुर्ची, किचन, बाथरुम हे सर्वच आहे. पण या रुमला दरवाजाच नाहीये.
हॉलिवूड सिनेमा 'नार्निया' तुम्ही पाहिला असेलच. या रुमचा दरवाजा देखील त्या सिनेमाच्या स्टाइलने तयार करण्यात आला आहे. म्हणजे या रुममध्ये जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी लोकांना कपाटाच्या आत जावं लागतं.
कपाटासोबतच खिडकीतूनही तुम्ही रुममध्ये शिरु शकता. सोशल मीडियावर या अनोख्या रुमचे फोटो सद्या व्हायरल झाले आहेत. या दरवाज्याची चांगली चर्चाही रंगली आहे.