Unique Resignation Letter: आजच्या काळात नोकरी करणं, पैसा कमवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे लोक रोजगाराच्या नवनव्या संधी शोधत असतात. पण नोकरीतून मिळणारा आनंद कमी झाला किंवा दुसऱ्या ठिकाणी अधिक चांगली संधी मिळाली तर लोक हातात असलेली नोकरी सोडतात आणि दुसऱ्या कंपनीत कामावर रुजू होतात. जुनी नोकरी सोडायची असेल तर अधिकृतरित्या प्रत्येकाला राजीनामा पत्र द्यावे लागते. सुरूवातीला राजीनामा हाताने लिहिलेल्या स्वरूपात द्यावा लागायचा, नंतर टाइप केलेले लेटर देण्याची पद्धत आली, पण आता तर थेट ई-मेलवरूनही राजीनामा दिला जातो आणि स्वीकारलाही जातो. काही लोक आपला राजीनामा अतिशय मुद्देसूद किंवा पद्धतशीर लिहितात, पण काहींचा राजीनामा इतका विचित्र असतो की कोणीही चक्रावून जाईल. असे एकापेक्षा एक विचित्र राजीनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक विचित्र आणि प्रचंड व्हायरल झालेला राजीनामा दाखवणार आहोत. हा राजीनामा पाहून तुम्हीदेखील नक्कीच पोट धरून हसाल.
तीन शब्दांचा राजीनामा
नुकताच व्हायरल झालेला राजीनामा हा वाचायला सुरुवात करताच लगेच संपतो इतका छोटासा आहे. कारण या राजीनाम्यातील शब्द अगदीच कमी आहेत. हे लेटर खूपच छोटे आहे. अनेक वेळा लोक आपल्या जुन्या कंपनीप्रति असलेला आदर, प्रेम किंवा राग राजीनाम्यात व्यक्त करतात. पण काही लोक इतके विचित्र असतात की ते असा राजीनामा देतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. एका व्यक्तीने बॉसला अशा अनोख्या पद्धतीने राजीनामा पत्र पाठवले होते, जे सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पाहिले आणि शेअर केले. मोजक्या शब्दांच्या या राजीनाम्यात एका व्यक्तीने केवळ तीन शब्द लिहून नोकरी सोडली. त्यामुळेच हा राजीनामा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनलाय. या राजीनाम्यात कर्मचाऱ्याने लिहिलेले तीन शब्द आहेत.. बाय बाय सर (Bye Bye Sir).
राजीनाम्याचे हे पत्र ट्विटरवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @MBSVUDU नावाच्या अकाऊंटद्वारे या वर्षी शेअर करण्यात आले होते. ते मोठ्या प्रमाणावर पाहिले गेले आणि खूप पसंत केले गेले. अनेकांना हे राजीनाम्याचे पत्र मजेदार वाटत आहे, तर अनेकांना ते अगदीच साधे वाटत आहे. सामान्यतः लोक राजीनामा पत्र लिहिताना खूप विचार करतात. लोकांना बॉससोबतचे त्यांचे नाते खराब करायचे नसते, कारण त्यांना पुन्हा त्याच कंपनीत काम करावे लागू शकते. त्यामुळे ते तसा विचार करतात. पण ही पोस्ट पाहून यूजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये व्यक्तीनेही लिहिले आहे, 'सिंपल.' त्यामुळेच हे लेटर व्हायरल झाले आहे.