न्यूयॉर्क : अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना प्रांतातील कार्ली पॅवलिनॅक ब्लॅकबर्न या तरुणीने नोकरीसाठी आपला बायोडेटा स्पोर्ट्स साहित्य बनवणाऱ्या प्रसिद्ध ‘नायकी’ कंपनीला पाठवला, तोही अनोख्या पद्धतीने. तिने बायोडेटा चक्क केकवर छापला.
मुलीच्या मैत्रिणीने ही आयडिया दिली होती. ती क्रिएटिव्ह जागा आहे, त्यामुळे सामान्य बायोडेटा पाठवण्याऐवजी, अनोखा बायोडेटा पाठवला तर निवड होण्याची शक्यता वाढेल, असे मैत्रिणीने सांगितले. त्यानंतर ‘जस्ट डू इट डे’ निमित्त नायकीने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत कार्लीने हा अनोखा खाण्यायोग्य केक पाठवला.
याबाबत तरुणीची लिंक्डइनवरील पोस्ट व्हायरल झाली. यानंतर, कंपनीतील काही लोकांशी बोलणे झाले, पण अद्याप नोकरीची ऑफर मिळालेली नाही, असेही तिने दुसऱ्या पोस्टमध्ये सांगितले. तिने नेटकऱ्यांचे लक्ष मात्र वेधले आहे. काहीजणांनी तिची कल्पना अद्भुत असल्याचे म्हटले तर काहींनी तिला 'नौटंकी' म्हटले आहे.