यूएस (US)च्या फ्लोरिडामध्ये अशी घटना पाहायला मिळाली, जी या आधी कधीच पाहायला मिळाली नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक मगर रस्त्याभोवती लावण्यात आलेल्या जाळीवर चढताना दिसत आहे. ही मगर जाळी पार करून जॅक्सनविले (Jacksonville) के मिलिट्री बेसच्या नेवल एअर स्टेशनमध्ये जात होतं.
व्हायरल व्हिडीओमध्ये क्रिस्टीना स्टुवर्टने शेअर केला आहे. जो मागील आठवड्यातील शनिवारी मिलिट्री बेसकडे कारने जात होती. त्यांनी पाहिले की, एक मगर जाळीवर चढून जाळीच्या दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत होती. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी फेसबुकवर लिहिलं की, 'खूश हूं की, मगरीला जाळीवर चढताना पाहिलं आणि काही वेळातच ती पलिकडे जाऊन निघूनही गेली.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाले. एका यूजरने लिहिलं आहे की, 'हे भगवान, काय पागलपणा आहे.' तसेच आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, 'हे फारच भयानक आहे.'
फ्लोरिडामध्ये मगरी दिसणं हे सामान्य गोष्ट आहे. व्हिडीओ शेअर करताना क्रिस्टीना यांनी लिहिलं की, 'जर फ्लोरिडामध्ये नवीन असाल किंवा खूप दिवसांपासून राहत असाल. मग तुम्ही नदीच्या आजूबाजूला फेरफटका मारा. तुम्हाला समजेल की, किती मगरी आहेत.'