भारतात जास्तीत जास्त लोकांचं शहरातून परदेशात जाण्याचे स्वप्न असतं. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाबाबत सांगणार आहोत. ज्याच्या यशाची कहाणी वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अमेरिकेत नोकरीसाठी गेलेला माणूस भारतात आपल्या गावी परतला आणि शेती करायली सुरूवात केली. अमेरिकेतील भरगच्च पगाराची नोकरी सोडून एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणानं चक्क शेती केली आहे.
अमेरिकेतील लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून एक सॉफ्टवेअर इंजिनिअर मायदेशी परतला आहे आणि आपल्या गावात मक्याची शेती करत आहे. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील शेलाही गावाचा रहिवासी असलेल्या या तरूणाचं नाव सतिश कुमार आहे. गावाकडे येऊन शेती करण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनं अमेरिकेतील नोकरी सोडली.
सतीश यांनी एनआयशी बोलताना सांगितले की, ''मी लॉस एंजेल्स, युनायटेड स्टेट्स आणि दुबईमध्ये काम करणारा सॉफ्टवेअर इंजिनियर होतो. अमेरिकेत मला एका वर्षाला १ लाख अमेरिकन डॉलर्स मिळत होते. पण ते काम करण्यातून मला मानसिक समाधान आणि आनंदही मिळत नव्हता. त्याशिवाय मला माझ्या आयुष्यात जे कारायचं होतं, त्यासाठी वेळच मिळत नव्हता. त्यामुळे मी नोकरी आणि अमेरिका सोडून पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला.''
पुढे त्यांनी सांगतले की, ''मी २ वर्षापूर्वी शेती सुरू केली. मागच्या महिन्यात मला २ एकर जमिनीत केलेल्या शेतीतून २.५ लाख रुपये मिळालं आहे.'' मोठ्या पगाराची नोकरी सोडून गावी परतण्याचे धाडस सतिश यांनी दाखवलं. मक्याची शेती करण्यासाठी सतीश हे आपल्या कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील मूळ गावी परतले. शेतीतून मिळत असलेल्या उत्पनत सतिश समाधानी आणि आनंदी आहेत.
हे पण वाचा-
महिला पेटवत होती मेणबत्ती, हॅंड सॅनिटायजरमुळे अचानक झाला स्फोट आणि...
शाब्बास पोरा! १० वी च्या पोरानं भंगारापासून बनवली भन्नाट बाईक; नेटिझन्सना आठवलं पबजी....