दीक्षांत समारंभात काळा लांब कोट आणि डोक्यावर टोपी घालून डिप्लोमा सर्टिफिकेट घेणं हा कोणत्याही विद्यार्थ्यासाठी फारच आनंदाचा क्षण असतो. यावेळी काहींच्या आनंदाला सीमा नसते. असाच एका विद्यार्थ्याच्या आनंदाची सोशल मीडियात सध्या चर्चा रंगली आहे. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.
अमेरिकेत दीक्षांत समारोहात विद्यार्थ्यांना डिप्लोमा सर्टिफिकेट दिले जात होते. विद्यार्थी एका रांगेत उभे राहून आळीपाळीने सर्टिफिकेट घेत होते. या रांगेत एक विद्यार्थी होता, त्याला इतका आनंद झाला होता की, त्याने असाकाही स्टंट केला की, तिथे उपस्थित सर्वांची जोरात किंकाळी निघाली.
झालं असं की, या विद्यार्थ्याने आनंदाच्या भरात स्टंट केला खरा, पण तो फसला. म्हणजे त्याला जसा हा स्टंट करायचा होता तसा तो झाला नाही. त्यामुळे त्याच्या मानेला गंभीर जखम झाली.
हा व्हिडीओ ट्विटरवर viridiana नावाच्या यूजरने १७ मे रोजी शेअर केला. ही बातमी लिहित असेपर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी रिट्विट केला. आतापर्यंत हा व्हिडीओ ५० लाख लोकांनी पाहिला.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक विद्यार्थी जोश जोशमधे बॅक-फ्लिप मारतो. पण काहीतरी चुकतं आणि तो मानेवर पडतो. हे पाहून सर्वांना धक्का बसतो. एकंदर काय तर उत्साहाच्या भरात जे करायचंय ते सांभाळून करा नाही तर असं होतं.