यूएसएमधील मॅसेच्युसेट्सच्या केप कोड बेमध्ये एक हैराण करणारा प्रकार घडला आहे. गेल्या काही दिवसांपासून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. घडलं असं की, एक कुटुंब एका बोटीमध्ये बसून फिशिंग करत होतं. जिथे अचानक पांढऱ्या रंगाचा शार्क आला.
एवढचं नाहीतर पाण्यातून बाहेर येत तो या कुटुंबाच्या अगदीच जवळ आला होता.
सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. खरं तर फिशिंग करण्यासाठी या कुटुंबाने फिशिंग रॉडचा काटा पाण्यात टाकला होता.
काही वेळातच मोठा मासा गळाला लागला असं समजून त्यांनी फिशिंग रॉडचा दोरा पटकन गुंडाळण्यास सुरुवात केली. पण मासा फार मोठ्या असल्यामुळे दुसऱ्या एका महिलेने हाताने मासा पाण्याबाहेर काढण्यास सुरुवात केली. पण तेवढ्यात एक शार्क तिथे आला आणि गळाला लागलेला मासा त्याने खाऊन टाकला.
The Guardian ने दिलेल्या वृत्तानुसार, डो नेल्सनचा मुलगा जॅक मासा पकडण्यासाठी बोटीचा किनाऱ्यावरच उभा असतानाच तिथे अचानक शार्क आला. हा व्हिडीओ ट्विटरवर अटलांटिक व्हाइट शार्क कंजर्वेंसी यांनी शेअर केला असून ही संस्था व्हाइट शार्कवर रिसर्च करते.
रविवारी शेअर करण्याच आलेल्या या व्हिडीओला 159K एवढे व्ह्यूव मिळाले होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोक हैराण झाले आणि त्यांनी अनेक कमेंटही केल्या आहेत.