केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांसाठी सक्रिय असतात. अनेकदा स्मृती इराणींना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नेहमी ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी किंवा अनेकदा आपल्या फॉलोअर्सनी विचारलेल्या महत्वाच्या नसलेल्या प्रश्नांना दिलेल्या जबरदस्त उत्तरामुळे त्या प्रसिद्ध होत असतात. आत पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता स्मृती इराणी एका लॅपटॉपवर काम करत आहे.
आजूबाजूला गार्डनमध्ये हिरवळ दिसून येत आहे. इन्स्टाग्रामवर यांनी हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये #PandemicMorning असं म्हटलं. इराणी यांनी नीळ्या रंगाच्या ड्रेससोबत पायात हवाई चप्पल घातल्याचं फोटोमध्ये स्पष्ट दिसत होतं. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अन् आता १० रूपयात लोकांना पोटभर जेवण पुरवतोय 'हा' अन्नदाता
या फोटोवर एका युजरने ‘हवाई चप्पल’ अशी कमेंट केली. त्यावर स्मृती इराणी यांनी “अरे भाई…२०० रुपयांची हवाई चप्पल आहे, आता ब्रँड विचारु नको, लोकल आहे”, असं गमतीदार उत्तर दिलं आहे. ‘व्होकल फॉर लोकल’चा पाठिंबा देत असल्याचे अनेक युजर्सनी कमेंट्मध्ये सांगितले आहे. आतापर्यंत ८२ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या इन्स्टाग्राम पोस्टला मिळाले असून ६०० पेक्षा युजर्सनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. Video : कमाल! कात्री, कंगवा घेतला अन् स्वतःच न्हावी बनला, अशी केली जबरदस्त हेअरस्टाईल