अमेरिकेतील उटाहमधील सहा महिन्यांच्या एका चिमुरड्याने विश्व विक्रम केला आहे. सगळ्यात कमी वयातील वॉटर स्किइंग करणारा व्यक्ती हा चिमुरडा (Youngest Person Ever To Go Water Skiing) ठरला आहे. सोशल मीडियावर या चिमुरड्याचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. हा चिमुकला लेक पॉवेलमध्ये रिच हम्फ्रीज वॉटर स्कीइंग करताना दाखवत आहे. यामुळे अनेक सोशल मीडिया युजर्सचे आपापसात मतभेद झाले आहेत. युपीआय या वेबसाईडनं दिलेल्या माहितीनुसार या लहान मुलाच्या आई वडिलांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचे नाव केसी आणि मिंडी हम्फ्रिज आहे.
या चिमुरड्याच्या आई वडिलांनी त्याच्या नावानं अकाऊंट सुरू केलं आहे. हा व्हिडीओ त्याच अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. या चिमुरड्यानं बोटीशी जोडेलेल्या एका रॉडला घट्ट पकडलं आहे. या लहान मुलाचे आई वडिल त्याला पाहत आहेत. इतकंच नाही तर संपूर्ण सुरक्षेसह त्यांनी आपल्या मुलाला पाण्यात पाठवलं आहे. लाईफ जॅकेट घातलेलं तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता.
या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे की, मी माझ्या सहाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं वॉटर स्किइंग करण्यासाठी गेलो होतो. हे खूपच मोठं आणि कठीण काम असून मी वर्ल्ड रिकॉर्ड केला आहे. हा व्हिडीयो १३ सप्टेंबरला सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्हिव्हज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे.
हे पण वाचा-
Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'
काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ
शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा
बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ
लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...