जगभरात वेगवेगळ्या लव्हस्टोरी आपण वाचत, ऐकत आणि बघत असतो. ज्या लव्हस्टोरीबाबत आम्ही तुम्हाला सांगतोय ती सुद्धा एखाद्या बॉलिवूड सिनेमाची कथा शोभावी अशीच आहे. पण ही कथा नसून प्रत्यक्षातील लव्हस्टोरी आहे. उत्तर प्रदेशातील महिला कॉन्टेबल आणि एका गॅंगस्टरची भेट कोर्टात एका सुनावणी दरम्यान झाली आणि दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली.
उत्तर प्रदेश पोलिसातील महिला कॉन्टेबल पायल ही पहिल्यांदा ग्रेटर नोएडा येथील कोर्टात गॅंगस्टर राहुल थारसानाला(३०) भेटली. इथे राहुलच्या एका केसची सुनावणी सुरू होती. राहुल हा उद्योगतपी मनमोहन गोयल हत्या प्रकरणातील आरोपी होता. त्याला ९ मे २०१४ रोजी अटक करण्यात आली होती.
राहुल थारसानावर लूट आणि हत्येच्या वेगवेगळ्या केसेस आहेत. पायलची पोस्टींग सुरजपूर कोर्टात होती. इथेच दोघांची भेट झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ती सतत राहुलच्या संपर्कात राहू लागली. मग तो तरूंगात असो वा बाहेर. त्यांचं प्रेम इतकं वाढलं की, नंतर त्यांनी लग्न केलं.
दोघांच्या लग्नाचे फोटो नुकतेच राहुलने सोशल मीडियावर शेअर केलेत. पण त्याने कुठे आणि कधी लग्न केलं याबाबत काहीही माहिती शेअर केली नाही. तेच दुसरीकडे पायच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या लग्नाबाबत काहीच पत्ता नाही. असे सांगितले जाते की, पायल ही गौतमबुद्ध नगर पोलीस स्टेशनला तैनात आहे. यावर जागरण दैनिकाला एसएसपी वैभव कृष्ण यांनी सांगितले की, पायल नावाची महिला कर्मचारी जिल्ह्यात कुठेच तैनात नाही. तर राहुल थारसानासोबत फोटोत पोलिसांच्या वेशात दिसणारी महिला कोण आहे, याची चौकशी केली जाणार आहे.