उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून आलेल्या भीषण जलप्रलयामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या जलप्रलयादरम्यान, दुर्घटनास्थळी अनेक लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १४ मृतदेह सापडले आहेत. अनेक लोक अजूनही मलब्याखाली दबले असल्याची शंका आहे. अंदाज लावला जात आहे की, साधारण १७० लोक बेपत्ता आहेत. तपोवनमधील पॉवर प्रोजेक्ट उद्ध्वस्त झालं आहे. काल टनलमध्ये फसलेल्या १२ लोकांना काढण्यात आलं. जवान सतत ब्रेक न घेता बचावकार्य करत आहेत. टनलमध्ये अजूनही ३० लोक अडकल्याची शंका आहे.
#UttarakhandDisaster ट्विटरवर ट्रेन्ड होत आहे. सध्या बचावकार्य वेगाने सुरू आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता जवान बचावकार्यात काम करत आहेत. या बचावकार्याने अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. लोक सोशल मीडियावरून यात अडकलेल्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे. (हे पण बघा : Photos: चोमोलीत NDRF आणि ITBP जवान उतरले चिखलात, कामगारांचा शोध सुरुच)
चोमोली जिल्ह्यात रात्रभर बचाव कार्य सुरू होतं. आयटीबीपी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम या बचावकार्यात आहेत. काही वेळातच वायुसेनेची टीमही त्यांना मदत करू शकणार आहे.
दरम्यान सर्वात जास्त नुकसान रैणी गावातील लोकांचं झालं आहे. इथे १०० पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहे. चोमोली पोलीस स्टेशनने ट्विट करून लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. आम्ही या बचावकार्यातील प्रत्येक जवानाला सलाम करतो आणि आशा आहे की, लोक सुरक्षित राहतील.