कचऱ्यात किंवा मैदानात नवजात बाळ सापडलं अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. उत्तराखंडमध्ये एका शेतात नवजात बाळा मातीत पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मातीत पुरलेल्या नवजात बाळाला अनेकांनी पाहिलं. सर्वत्र त्याची चर्चा होत होती, परंतु त्याला हात लावायला कोणीही तयार होत नव्हतं. परंतु कुंदन भंडारी या व्यक्तीने त्या बाळाची अवस्था पाहून प्रसंगावधान दाखवत या बाळाला वाचवण्यासाठी पाऊलं उचलली.
घटनास्थळी जमलेल्या लोकांनी पोलिसांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली नंतर त्या ठिकाणचे लोक पोलीस येईपर्यंत त्यांची वाट पाहात होते. पण कुंदन भंडारी यांनी कसलाही विलंब न लावता या बाळाचा जीव वाचवण्यासाठी मोठी रिस्क घेतली. आता या बाळाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा' असं म्हणत त्या नवजात बाळाला उचललं. मातीतून बाहेर काढल्यानंतर चिमुकल्याच्या नाकात, तोंडात माती गेली होती. कुंदन त्या बाळाच्या नाका-तोंडातील माती साफ करत थेट रुग्णालयाकडे निघाले. बळीराज्याला रडवणाऱ्या कांद्याच्या समस्येवर मराठमोळ्या तरूणीनं शोधला उपाय; मंत्र्यांनीही केलं कौतुक
रस्त्यातच त्यांना एक रुग्णवाहिका दिसली, त्यांनी त्या बाळाला त्यांच्याकडे सोपावलं. आता बाळाला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलीस घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांकडे चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे. वेळीच कुंदन यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे या बाळाला वाचवण्यात यश आलं आहे. माणूसकीला सलाम! दगडाखाली २ तास अडकलेल्या महिलेला गावकऱ्यांनी दिलं जीवदान; पाहा फोटो