ऑफ रोडिंगसाठी THAR नदीत नेली; अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन्, पाहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 04:40 PM2023-10-04T16:40:44+5:302023-10-04T16:41:49+5:30
Uttarakhand River Video: उत्तराखंडच्या अल्मोडातून धक्कादायक घटना समोर आली आहे.
Off Roading Driving In Uttarakhand: आजकाल तरुणांमध्ये ऑफर रोडिंगची क्रेझ वाढली आहे. यासाठी तरुण आपल्या चारचाकी गाड्या घेऊन डोंगराळ भागात फिरायला जातात. पण, अनेकदा हा थरार अनुभवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. असाच काहीसा प्रकार तीन तरुणांसोबत झाला. उत्तराखंडच्या अल्मोडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन तरुण मुलांनी ऑफ रोडिंगचा थरार अनुभवण्यासाठी आपली SUV नदीत नेली, पण अचानक नदीचा प्रवाह वाढल्याने तिघे नदीत अडकले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दिल्ली एनसीआर के तीन युवक उत्तराखंड के अल्मोड़ा में बाल बाल बचे, थार से रामगंगा पार करने की कोशिश कर रहे थे। pic.twitter.com/XuEyu6cbjR
— Greater Noida West (@GreaterNoidaW) October 3, 2023
तिघांनी त्यांची महिंद्रा थार एसयूव्हीने रामगंगा नदी पार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गाडी नदीत नेली, पण यावेळी अचानक नदीचा प्रवाह वाढला आणि गाडी नदीत अडकली. एसयूव्ही नदीच्या मधोमध अडकली, त्यात बसलेल्या तिघांचा जीव धोक्यात आला. यानंतर तिघे गाडीच्या बाहेर आले आणि जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केला.
यानंतर किनाऱ्यावरील काही तरुणांनी एका झाडाला दोरी बांधली आणि त्या दोरीच्या मदतीने गाडीतील तरुण नदीबाहेर आले. एक एक करत तिघे सुखरुप बचावले. पण, त्यांची गाडी नदीतच अडकली दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, यावर अनेकजण प्रतिक्रियाही देत आहेत.