शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

“मी २० रुपयांचे मोमोज खातो आणि ती…” ‘वंशिका’च्या ब्रेकअप स्टोरीवर ‘बॉयफ्रेन्डचं’ उत्तर Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 18:02 IST

ट्विटरवर वंशिका आणि आकाश ट्रेंड करत होते. दोघांच्या ब्रेकअपनंतर आता बॉयफ्रेन्डनं तिलाच जबाबदार ठरवलं आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला की ट्विटरवर 'वंशिका' (#Vanshika) हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीला फोनवर तिच्या ब्रेकअपची कहाणी सांगताना रडत आहे. केवळ दोन महिन्यांच्या नात्यानंतर तिच्या प्रियकराने तिला कसे सोडले हे ती सांगत आहे. या काल्पनिक व्हिडिओला उत्तर म्हणून आता आणखी एक काल्पनिक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये 'बॉयफ्रेन्ड'ने दिलेले उत्तर दाखवण्यात आले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलीचे नाव वंशिका आणि मुलाचे नाव आकाश आहे. नवीन व्हिडिओमध्ये 'वंशिका' प्रमाणेच 'आकाश' देखील त्याच्या मित्राशी ब्रेकअपबद्दल बोलत आहे. आकाश म्हणतो - ही मुलगी सगळ्या जगाला काय म्हणत आहे. तिच्या मागे पोरांची लाईन असायची तर करीना कपूर बनून सगळ्यांना नाकारायची काय गरज होती. जर कोणी दोन महिन्यांच्या नात्यासाठी लग्नाची तयारी करत असेल तर मी काय करावे?

या व्हिडीओमध्ये आकाशनं वंशिकाच्या महागड्या हिल्स खरेदीच्या वक्तव्यावरही आपली प्रतिक्रिया दिली. तिला सर्वच गोष्टींची माहिती असते पण सेलची माहिती नव्हती. आता तिच्या चुकीच्या शॉपिंगबद्दल मी काय करू? असं तो या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. फुटबॉल पाहण्याच्या वक्तव्यावरही आकाशनं म्हटलं, ती माझ्यासाठी मॅच पाहत नव्हती, तिला रोनाल्डो आवडतो म्हणून ती पाहत होती. यानंतर तो खाण्यापिण्यावरही उत्तर देतो. मी गल्लीतील २० रुपयांचे मोमोज खातो. परंतु ती ५०० रुपयांचे बिल भरायला लावते आणि पैसे वाचवण्याच्या गोष्टी करते. हद्दच झाली, ब्रेकअप तर होणारच होतं.

ब्रेकअपवर वंशिकानं काय म्हटलेलं?यापूर्वी एका व्हायरल व्हिडीओमध्ये वंशिकाचं वक्तव्यही होतं. कॉलेजमध्ये माझ्यामागे मुलांची लाईन लागायची, परंतु याच्यासाठी मी सर्वांना रिजेक्ट केले. परंतु याने दोन महिन्यातच ब्रेकअप केलं, असं वक्तव्य असणारा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आकाशसाठी आपण महागड्या हाय हिल्स खरेदी केल्या. सेलची वाटही पाहिली नाही. त्याच्यासाठी फुटबॉल मॅचही पाहायला सुरूवात केली. समजत नव्हतं तरी पाहिले, असेही तिनं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटले होते.

परंतु हे व्हिडीओ काल्पनिक असल्याचे दिसून येतेय. असे असले तरी सोशल मीडियावर मात्र वेगाने हे व्हिडीओ व्हायरल झाले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलTwitterट्विटर