Beer glass girl viral video : हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करण्यासाठी चपळता खूप महत्त्वाची आहे. चांगली सेवा देऊन ग्राहकाला खूश करणे हे महत्त्वाचे काम मानले जाते. यामुळेच वेटर आणि वेट्रेस त्यांच्या कामात नैपुण्य मिळवतात. याशिवाय, काही वेळा ते काम करण्याचे वेगवेगळे मार्गही शोधून काढतात. यामुळे त्यांचे काम सोपे तर होतेच शिवाय ग्राहकांना प्रभावित करणेही सोपे जाते. याचेच एक उदाहरण नुकतेच सोशल मीडियावर पाहायला मिळाले. यामध्ये वेट्रेस आपल्या दोन्ही हातांनी बिअरचे भरलेले ग्लास एकाच वेळी उचलताना दिसते. हे करताना ती अजिबात तोल जाऊ देत नाही, किंवा एकही ग्लास खाली पडू देत नाही.
व्हायरल क्लिप ट्विटवर @TansuYegen नावाच्या युजरने पोस्ट केली आहे. म्युनिकच्या ऑक्टोबरफेस्टमधील वेट्रेसची ताकद आश्चर्यकारक आहे. अवघ्या ५५ सेकंदाच्या या क्लिपमध्ये महिला काउंटरवर उभी राहून बिअरचे ग्लास गोळा करताना दिसत आहे. मग ती पटकन सर्व ग्लास एकत्र करते आणि सर्व्ह करण्यासाठी बाहेर जाते. असे केल्याने कमी वेळेत जास्त ऑर्डर मिळू शकतात. जेणेकरून ग्राहक रेस्टॉरंट किंवा बारच्या सेवेवर खूश होईल आणि प्रत्येक वेळी तेथेच येईल असं मानलं जातं. पाहा व्हिडीओ-
विशेष बाब म्हणजे समतोल साधण्यासोबतच वेट्रेसच्या हातांची ताकदही पाहण्यासारखी आहे. कारण इतक्या ग्लासांचे भरल्यानंतरचे वजन खूप जास्त असते. म्युनिकच्या ऑक्टोबरफेस्ट दरम्यानचे हे दृश्य आहे, ज्याला बीअर फेस्टिव्हल असेही म्हणतात. हा व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.