सोशल मीडियावर सध्या लॉकडाऊन दरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एका कथित बॅंक कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक कॅशिअर कशाप्रकारे सुरक्षेची काळजी घेतोय, हे दिसून येतंय. बॅंक कर्मचाऱ्यांने भन्नाट जुगाड केलं असून त्याचं लोकांकडून कौतुक केलं जात आहे.
हा बॅंक कर्मचारी टेबलवर चक्क प्रेस आणि चिमटा घेऊन बसलाय आणि प्रत्येक स्लीप चिमट्याने धरतो, त्यानंतर प्रेसने गरम करतो आणि नंतर त्याचं काम करतो. 27 सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच हे वाटेल की, भारतीय लोक जुगाड करण्यात एक नंबरवर आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत स्पष्ट माहिती नाही. पण काही लोक हा व्हिडीओ गुजरातमधील असल्याचे सांगत आहेत.
हा व्हिडीओ Ananth Rupanagudi नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केलाय. त्याला त्याने कॅप्शन दिले की, 'एक बॅंक कर्मचारी ड्यूटी दरम्यान काही कोरोना व्हायरसला मारताना'.
हा व्हिडीओ आतापर्यंत 65 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आणि 3 हजारपेक्षा जास्त लोकांनी याला लाइक केलंय. तर 1 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केलाय.