मुलं आपल्या पालकांची काळजी घेतात ही भारतात नवीन गोष्ट नाही. या देशात मुलं ज्या संस्कृतीत वाढतात, ती पाहता त्यांना त्यांच्या पालकांची काळजी घ्यावी लागते हे जवळपास गृहीत धरले जाते. पण, हायवेवर चढायला मदत करण्यासाठी एक लहान मुलगा जेव्हा आपल्या पालकांची सायकल ढकलतो, तेव्हा ये-जा करणाऱ्यांचे डोळे नक्कीच पाणावतात. अशीच एक घटना नुकतीच कॅमेऱ्यात कैद झाली आहे,
IAS अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर या घटनेचा एक व्हि़डीओ शेअर केला असून तो आता जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस हायवेवर बाईक चालवताना दिसत आहे आणि एका कुटुंबाचा व्हिडीओ बनवत आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जात आहे, तसतसा एक लहान मुलगा त्याच्या पालकांना हायवेवर जाण्यास मदत करण्यासाठी सायकल ढकलताना दिसत आहे.
बाईकवरचा माणूस कुटुंबाजवळून जात असताना तो स्मितहास्य करतो. मुलगा फक्त हसत नव्हता तर त्याचे आई-वडीलही आनंदी दिसत होते. तीन लाखांहून अधिक व्ह्यूज असलेल्या या व्हिडिओने अनेकांची मने जिंकली आहेत.आयएएस अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आयुष्यभर आई-वडिलांचा असाच आधार राहा." मुद्द्याशी सहमत अशी एका युजरने कमेंट केली आहे.
"तुम्ही बरोबर आहात. पालक हे आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचे लोक आहेत जे आपल्याला जन्मापासून आपल्या विकासाच्या सर्व महत्त्वाच्या टप्प्यांपर्यंत मदत करतात. ते आपल्या जीवनात नेहमीच आपल्यासोबत असतात आणि जीवनातील प्रत्येक अडचणीचा सामना करण्यास मदत करतात." अनेकांनी तशाच प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने तर लिहिलं आहे - "संस्कार रक्तातच असतात." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"