तीनचाकी हातगाडीवाले लोक दिवसभर किती मेहनत करतात. त्यांना उन्हातान्हात किती ओझं वाहून न्यावं लागतं. तेव्हाकुठे रात्री त्यांच्या घरातील चूल पेटते. माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात एका बाइकरने मन जिंकणारं काम केल्याचं दिसतं. बाइकवाला रिक्षावाल्याची ज्याप्रमाणे मदत करतो ते बघून हेच म्हणावं वाटतं की, माणूसकी अजूनही या जगात शिल्लक आहे.
सेहवागने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'माणूसकी जिंदाबाद...एका बाइकरने एका कपलला वस्तूंनी भरलेला रिक्षा ओढताना पाहिलं. तर बाइकरने महिलेला रिक्षात बसण्यास सांगितलं आणि त्याने बाइक चालवत रिक्षाला धक्का देत मेन रोडपर्यंत सोडलं'.
हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत २.३ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ दिल्लीतील एनसीआरमधील असल्याचं सांगितलं जात आहे. NCR Bikerz नावाच्या यूट्यूब चॅनलवर स्वत:ला Rammy Ryder सांगणाऱ्या व्यक्तीने जेव्हा या कपलला रिक्षा ओढताना पाहिलं तर त्याने मदतीसाठी पुढाकार घेतला. त्याने महिलेला रिक्षात बसण्यास सांगितले आणि पायाच्या मदतीने त्याने बाइक चालवत रिक्षाला धक्का दिला.
अशा मेहनीत लोकांना मदत करणं ही एक फारच चांगली गोष्टी आहे. बऱ्याचदा या जगात माणूसकी शिल्लक राहिली नाही असं बघायला मिळतं. पण अशा घटना समोर आल्यावर जगात अजूनही थोडी माणूसकी शिल्लक असल्याचं दिसून येतं.