जंगलात फिरत असलेल्या एका ब्लॅक पँथरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दुर्मिळ दृश्य भारतातील रस्त्यावर कैद झाले असून आतापर्यंत निश्चित स्थळाबाबत माहिती मिळालेली नाही. भारतीय वनसेवेतील अधिकारी प्रविण कासवान यांनी ट्विटरवर या ब्लॅक पँथरचा व्हिडीओ शेअर केला आहे. वनविभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना हा व्हिडीओ पाठवला होता. शिकाऱ्यांना ब्लॅक पँथरचा ठावठिकाणा लागू नये यासाठी जागेचा खुलासा केलेला नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या किनारी ब्लॅक पँथर उभा आहे. जेव्हा त्याला कार दिसते त्याक्षणी तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो. बराच वेळ रस्त्यावर फिरल्यानंतर ब्लॅक पँथर जंगलाच्या दिशेने जातो. हा व्हिडीओ कारमध्ये बसलेल्या एका माणसाने शूट केला आहे. प्रवीण कासवान यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, भारताचा ब्लॅक पँथर.
हा व्हिडीओ २४ ऑक्टोबरला ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला १.६ लाख व्हिव्हज मिळाले असून आयएफएस अधिकारी यांनी ऑडिओ काढून टाकण्यास सांगितले आहे. कारण ते लोक जी भाषा बोलत आहेत. ती ओळखून त्या ठिकाणाचा अंदाज लावता येऊ शकतो. १३ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून २ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कमेंटमध्ये त्यांनी सांगितले की, भारताच्या अनेक राज्यांमध्ये ब्लॅक पँथर दिसून येतो. हा केवळ सामान्य बिबट्या असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वाहतूक पोलिसाला झाडू मारताना पाहून नेटिझन्सनी केलं सॅल्यूट; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
काळा बिबट्या वेगळा कसा?
काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता, नेहमीचे ठिपके दिसतात. काळे बिबटे हे दाट जंगलांमधे जास्त असतात. तिथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो असे मानले जाते. भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात, आसाममध्ये व नेपाळमध्ये आढळतात. आफ्रिकेमधे ते माउंट केनियाच्या जंगलांमध्ये आहेत. मानलं गड्या! पार्ट टाईम जॉब म्हणून मास्तरानं सुरू केली शेती अन् आता घेतोय १ कोटींची कमाई