ब्राझीलमधील एका सौंदर्य स्पर्धेचा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. वृत्तानुसार, शनिवारी येथे LGBTQIAP+ समुदायाच्या सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये नथाली बेकर नावाची स्पर्धक दुसरी आली तेव्हा नथालीचा पती इतका नाराज झाला की त्याने रागाने स्टेजवर जाऊन तिच्याकडून काऊन हिसकावून घेतला आणि आपटून तोडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे, ज्यावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या तर अनेकांनी ही वागणूक योग्य नसल्याचं सांगितलं. 'न्यूयॉर्क पोस्ट'ने स्थानिक वृत्तांचा हवाला देत म्हटलं आहे की, मिस गे माटो ग्रोसो 2023 स्पर्धेत शनिवारी ही घटना घडली. नथाली दुसऱ्या क्रमांकावर आली. तिच्या नवऱ्याला ही गोष्ट आवडली नाही. तो अचानक स्टेजवर आला आणि रागाने त्याने विजेत्या इमानुएली बेलिनीचा क्राऊन हिसकावून घेतला आणि तिला स्टेजवरून खाली पाडला. यानंतर त्याने पत्नीचे केस ओढून जबरदस्तीने तिला स्टेजवरून खाली नेले.
जेव्हा हे सर्व घडले तेव्हा त्या व्यक्तीची पत्नी आणि स्पर्धेतील विजेते एकमेकांना मिठी मारत होते. समन्वयकांनी याचा निषेध केला आणि सांगितले की त्या व्यक्तीला असे वाटले की निर्णय योग्य नाही. आता या महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेचा व्हिडिओ @brunoguzzo या ट्विटर हँडलने 28 मे रोजी पोस्ट केला होता. लाखो व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत.
विजेतीचे नाव जाहीर झाल्यानंतर तिला क्राऊन देण्याची प्रक्रिया सुरू होती. पण तेवढ्यात एक माणूस स्टेजवर चढला आणि महिलेच्या हातातून क्राऊन हिसकावून घेतला. स्टेजवर फेकला. मग बायकोचे केस पकडून तिला खाली खेचतो आणि पुढे जातो. पण मग तो क्राऊन पुन्हा उचलतो आणि पुन्हा जमिनीवर आपटतो. दरम्यान, त्या व्यक्तीला नियंत्रित करण्यासाठी काही लोक मंचावर येतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.