ते म्हणतात, जसं कराल तसं मिळवाल. याचं उदाहरण सांगणाराच हा व्हिडीओ आहे असं म्हणावं लागेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये काही लोक म्हैस बांधली असलेल्या एका गाडीवर बसले आहेत. या गाडीसमोर आणखी एक गाडी आहे. यावरील लोक म्हशींना मारत आहेत आणि त्यांच्या क्षमतेपेक्षा वेगाने पळवत आहेत.
या व्हिडीओत एकप्रकारे प्राण्यांवर कशाप्रकारे अत्याचार होतात हे दाखवण्यात आलंय. पण जर तुम्ही प्राण्यांवर अत्याचार कराल तर तुम्हाला कशाप्रकारे शिक्षा मिळते हेही या व्हिडीओत बघायला मिळतं.वेगाने धावणारी एक गाडी रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळते. त्या गाडीवर बसलेले सगळे लोक फेकले जातात आणि म्हैस गाडी सोडून पुढे धावत जाते. हा व्हिडीओ जुना आहे. पण सध्या सोशल मीडियात पुन्हा व्हायरल झाला आहे.
आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून त्याला भारी असं कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 'या म्हशीला ग्लोबल सपोर्ट मिळतो आहे. असं वाटतंय एखादा सिनेमाही येईल 'बदला भैस का'.
या प्रकारातील गुन्हेगार असलेल्या दोघांची ओळख पटली असून ते मध्यप्रदेशातील उज्जैनमधील आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.