एखादी चूक केल्यानंतर त्याची शिक्षा मिळतेच असं तुम्ही ऐकलं असलेच. लगेच नाही तरी काही दिवसांनी, काही वर्षांनी केलेल्या चूकीबद्दल प्रत्येकाला पश्चाताप होतो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. भर रस्त्यात एका बाईकस्वाराने ओव्हरटेक केल्यामुळे त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. बाईकस्वार चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करत होता. या बाईकस्वाराला उंटाने दिलेली ही शिक्षा आयुष्यभर चांगलीच लक्षात राहील.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ऊंटाने या माणसाला वाहतूकीचे बेसिक नियम शिकवले आहे. डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याची पद्धत चूकीची आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता जसा बाईकस्वार डाव्या बाजूने ओव्हर टेक करायला जातो. त्याचवेळी ऊंट त्या माणसाला लाथ मारतो. या व्हिडीओमध्ये माणसांच्या हसण्याचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. शाब्बास! शिक्षण घेऊनही नोकरी नव्हती; प्लास्टीकच्या बाटल्यांपासून शौचालयं बनवतोय 'हा' इंजिनिअर
उंट चालत असल्यामुळे या माणसाला पुढे सरकायला जागाच नव्हती म्हणून त्याने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण उंटाने हा प्रयत्न काही यशस्वी होऊ दिला नाही. या व्हिडीओला आतापर्यंत ८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून १ हजारापेक्षा लाईक्स मिळाले आहेत. लोकांनी अनेक मजेशीर कमेंट्सचा वर्षाव या व्हिडीओवर केला आहे. याला म्हणतात मेहनत! सायकलस्वाराने शेअर केला पायांचा फोटो अन् नेटिझन्स म्हणाले....