शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Video : बागेत मादी सरडा अंडी देताना कॅमेरात कैद; पाहा दुर्मीळ दृश्याचा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 2:08 PM

रमेश हे नौदलातील निवृत्त कर्मचारी आहेत. सरड्याला अंडी देताना पाहून त्यांनी आपला मोबाईल काढला आणि हे दुर्मीळ दृश्य कॅमेरात कैद केले.

(Video Credit- NDTV)

तुम्ही आतापर्यंत सरड्याला रंग बदलताना पाहिलं असेल. सोशल मीडियावर सरड्याच्या रंग बदलण्याचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत व्हायरल झालेा आहेत. सध्या सोशल मीडियावर एक दुर्मीळ व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मादी सरडा अंडी देत आहे. आपल्या बागेत फिरत असताना पायलट श्रीनिवास रमेश यांना मादी सरडा दिसून आला. त्यावेळी मादी सरडा अंडी  देत होती. रमेश  हे नौदलातील निवृत्त कर्मचारी आहेत. सरड्याला अंडी देताना पाहून त्यांनी आपला मोबाईल काढला आणि हे दुर्मीळ दृश्य कॅमेरात कैद केले. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता  हिरव्या, भुरसट रंगाचा मादी सरडा अंडी देताना देत आहे. हे दुर्मीळ फुटेज श्रीनिवासन यांनी तामिळनाडू राज्यातील चेन्नईच्या तांबीरामधील आपल्या घराजवळील बागेतून कैद केले आहे.  जगभरात  सरड्याच्या २०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. सरड्यांच्या अनेक प्रजातींमध्ये स्वतःचा रंग बदलण्याची क्षमता असते.

भारतीय प्रजातींतील सरडे वेगाने रंग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहेत.  साधारणपणे  हिरव्या भूरसट रंगाचे सरडे आपला रंग सहज बदलू शकतात. शरीरातील तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी सरडे रंग बदलतात. एका रिसर्चनुसार, सरडे त्यांच्या भावनांनुसार रंग बदलतात. राग, आक्रामकता, एकमेकांशी बोलण्यासाठी आणि दुसऱ्या सरड्यांना आपला मूड दाखवण्यासाठी सरडे त्यांचां रंग बदलतात.

सरडे अनेकदा त्यांचा रंग नाही तर केवळ चमक बदलतात. तेच धोक्याच्या स्थितीत सरडे आपल्या रंगासोबतच आकारही बदलतात. सरडे त्यांचा आकार मोठाही करू शकतात आणि गरज पडेल तर छोटाही करू शकतात. सरड्यांच्या शरीरात फोटोनिक क्रिस्टल नावाचा एक थर असतो. याने सरड्यांना वातावरणानुसार रंग बदलण्यास मदत मिळते. फोटोनिक क्रिस्टलचा थर प्रकाशाच्या परावर्तनाला प्रभावित करते. ज्याने सरड्यांचा रंग बदललेला दिसतो.

जसे की, जेव्हा सरडा जोशमध्ये असतो तेव्हा फोटोनिक क्रिस्टलचा थर सैल पडतो. याने लाल आणि पिवळा रंग परावर्तित होतो. तेच सरडे जेव्हा शांत होतात तेव्हा हे क्रिस्टल प्रकाशातील निळ्या तंरगांना परावर्तित करतात. त्यासोबतच सरड्यांमध्ये क्रिस्टलचा आणखी एक थर असतो, जो इतर थरांपेक्षा मोठा असतो. फार जास्त प्रकाश असल्यावर हा थर सरड्यांना गरमीपासून वाचवतो.

वाह रे पठ्ठ्या! कोरोनाच्या भीतीनं भाज्या धुण्यासाठी 'असा' केला देशी जुगाड; पाहा व्हायरल व्हिडीओ

मूर्ती लहान, पण...; बुटकेपणावरून समाजाने टोमणे मारले, मात्र कठोर मेहनतीने त्यांनी IAS बनून दाखवले!

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके