कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. जो तो व्यक्ती जीव वाचवण्याासाठी आपापल्या घरातच आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अनेक ठिकाणी माणसांचा वावर पूर्णपणे बंद झाला आहे. रस्ते सामसूम झाले आहेत. अशा परिस्थितीत निसर्गाने आपलं सुंदर रूप दाखवायला सुरूवात केली आहे. असाच एक व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
गेल्या काही दिवसात प्राणी रस्त्यावर येण्याच्या घटना अनेक घडल्या आहेत. मुंबईत सुद्धा पारसी कॉलनीत मोरांचं नयनरम्य दृश्य पहायला मिळालं होतं. अशाच एका मोरोचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा मोर चंदीगडमधील रसत्यावर दिसून आला आहे. हा मोर मनमोहक नृत्य करत आहे.
आईएफएस ऑफिसर डॉ. अब्दुल जोकी यांनी हा व्हिडीयो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मोराला नाचताना पाहून तुमचा सगळा ताण निघून जाईल. असं म्हणतात की पाऊस आल्यानंतर मोर आनंदाने नाचायला लागतो. पण लॉकडाऊनमध्ये उन्हाळ्याच्या वातावरणात मोर नाचताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होतोय. या व्हिडीओवर अविश्वसनीय अशी कमेंट सुद्धा केली आहे.