ध्येय गाठण्यासाठी खूप लोक कठोर परिश्रम करतात, परंतु बहुतेक लोक आर्थिक अडचणींमुळे त्यांचे ध्येय पूर्ण करू शकत नाहीत. असे काही लोक आहेत जे आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करतात. अशीच गोष्ट आहे एका तरुणाची. ज्याची स्वप्नं ऐकून तुम्हालाही खूप प्रेरणा मिळेल आणि कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
तरुण दिव्यांग असूनही धीर सोडत नाही आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अडचणीचा सामना करण्यास तयार आहे. गौरव वासन या फूड ब्लॉगरने महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सूरजची गोष्ट दाखवली. सूरज सायकलवर बसून 15-15 रुपयांना समोसे कसा विकतोय, हे त्याच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न आहे, परंतु त्यासाठी कठोर परिश्रम सुरू केले आहेत.
फूड ब्लॉगरने त्याला तू इतके कष्ट का करतो असे विचारताच, तो इंग्रजीत बोलू लागला, जो व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये सूरज आपल्या व्हीलचेअरवर बसून 15 रुपये प्रति प्लेट दराने समोसे विकत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ गौरव वासन यांनी त्यांच्या "स्वाद ऑफिशियल" चॅनेलवर शेअर केला होता, त्यानंतर तो इतर प्लॅटफॉर्मवरही व्हायरल झाला होता.
सूरजने दिलेल्या माहितीनुसार, त्याने नागपूर विद्यापीठातून बीएससी पूर्ण केलं आहे, पण त्याला चांगली नोकरी मिळाली नाही. म्हणून, त्याने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आयएएस अधिकारी बनण्यासाठी पैसे कमवण्यासाठी समोसे विकण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. सूरजपासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"